जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फलटण नगर परिषदेमध्ये शपथ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ जून २०२५ - आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फलटण नगर परिषदेच्या सभागृहामध्ये एक विशेष शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व नगरपालिका कर्मचारी उपस्थित राहून पर्यावरण रक्षणासाठी शपथ घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण दिनाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकणाऱ्या माहितीपर भाषणाने झाली. त्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी स्वच्छता, हरित क्षेत्र वाढविणे, प्लास्टिक वापर टाळणे, पाणी आणि ऊर्जा संवर्धन या मुद्द्यांवर प्रतिज्ञा घेतली.
या उपक्रमाद्वारे फलटण नगर परिषदेकडून नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नगर परिषद प्रशासनाने नागरिकांनाही पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले आहे.
No comments