Breaking News

ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

International Yoga Day celebrated with enthusiasm at Bloom English Medium School and Junior College, Gunavare

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ जून २०२५ - ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ब्लूम इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे मध्ये दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने साजरा केला गेला. सकाळी आठ वाजता कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली त्यानंतर शारीरिक सुसूत्रता आणि मन:शांती यासाठी विविध योगासने सादर करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम, शीर्षासन, आणि ध्यान इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची आसने शिस्तबद्ध पद्धतीने केली. यामध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.त्यामुळे शालेय प्रांगणात योगाची सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत झाली.

    योग ही भारताची प्राचीन परंपरा असून आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीत योग ही एक आवश्यक गरज झाली आहे विद्यार्थ्यांनी दररोज योगाभ्यास करून आरोग्यदायी जीवन जगावे." तसेच योग हा केवळ शरीराची लवचिकता वाढवणारा व्यायाम नाही तर मानसिक संतुलन एकाग्रता आणि सामाजिक बंध दृढ करणारे सार्थक साधन आहे. आणि ब्लूम स्कूल नियमितपणे अशा उपक्रमांद्वारे आरोग्यवर्धक वातावरण निर्माण करण्यात अग्रणी असते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिया मिंड, संस्कृती देवकुळे इयत्ता ९वी या दोघींनी उत्तम प्रकारे केले. तसेच सोनिया निकम इयत्ता १०वी हिने आभार व्यक्त केले.

    संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गावडे, संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संभाजी गावडे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांचे योगविषयक प्रेम पाहून पंचक्रोशीतील सर्व पालकवर्गांने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

    आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वीरित्या संपन्न होण्यामध्ये सर्व विद्यार्थीवर्ग प्रशालेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने मोलाचे योगदान दिले.

No comments