Breaking News

कोळकी येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले - पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज

Mangalsutra snatched from woman's neck in Kolki - Police have CCTV footage

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ जून २०२५ -  अनंत मंगल कार्यालय ते नरसोबानगर, कोळकी, ता.फलटण जाणाऱ्या रोडवर दि. २१ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सौ. शोभा सदानंद पाटणकर (वय 66 वर्षे), व्यवसाय-गृहिणी, रा. नरसोबानगर, कोळकी या रस्त्यावरून जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसूत्र (गंठण) हिसकावून पळ काढला.

    चोरी करणारे आरोपी काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलवर होते. गाडीवर कोणतीही नंबर प्लेट नसल्याचे सांगण्यात आले आहे. गाडीचा वेग कमी करून पाठीमागे बसलेल्या इसमाने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले व ते दहिवाडीच्या दिशेने फरार झाले.

    या घटनेनंतर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार अमोल रणवरे हे करीत आहेत.

No comments