पिक उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक - विलास ताजने
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ जून २०२५ - फलटण फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण आयोजित एक दिवसीय व्याख्यान मार्गदर्शन उपक्रम कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून, कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, प्रगत कृषि तंत्रज्ञान, कृषिमधील कृत्रिम बुद्धिमत्ता, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने प्लॅस्टिकचा वापर व वाव या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोरीजी प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. विलास ताजने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी.चव्हाण, रिव्हिलीस इंडिया लिमिटेडचे श्री. नितीन जाधव, श्री योगेश कुलकर्णी, श्री. शहाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि समूह शेतीचा प्रयोग झाला पाहिजे. शेतकरी प्रयोगशील आहे, त्याला संधी उपलब्ध करून द्यायला हवी, शेती आता पारंपरिक राहिली नसून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. फवारणीसाठी ड्रोनचा वापर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर होत आहे, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन, नवीन कृषी तंत्रज्ञानाचे माहिती, समुह शेती या विविध विषयांवर मार्गदर्शन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी.चव्हाण यांनी केले.
सदरील कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राध्यापक व प्राध्यापकोतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.ए.डी. पाटील यांनी केले.
No comments