Breaking News

फलटणमध्ये पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती

Road repairs in Phaltan ahead of Palkhi festival

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ जून २०२५ - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दिनांक 28 जून रोजी फलटण शहरात आगमन होणार असल्याने शहरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीमुळे पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.

    फलटण नगरपरिषदेच्या पाठपुराव्यामुळे नॅशनल हायवे प्राधिकरण (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या मार्फत ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये रिंग रोड, मुधोजी हायस्कूल रस्ता, तहसील कार्यालय रस्ता यांसह पालखी मार्गाचा समावेश आहे, अशी माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली.

    या दुरुस्तीमुळे वारकऱ्यांना आणि शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे.

No comments