सातारा जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ जून २०२५ - सातारा जिल्ह्यात मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानली जाणारी बकरी ईद (ईद उल अझा ) शनिवारी उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली पावसाच्या शक्यतेमुळे इदगा मैदान गेंडामाळ येथे नमाज पठण झाले नाही सातारा शहरातील वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांवर नमाज अदा करण्यात येऊन मुस्लिम बांधवांनी एकमेकांना बकरीच्या शुभेच्छा दिल्या.
खासदार उदयनराजे भोसले वसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा सातारा जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना बकरीच्या शुभेच्छा दिल्या बकरी ईद या सणाला मुस्लिम बांधवांमध्ये मोठे महत्त्व आहे कुर्बानी ची ईद म्हणून या सणाला ओळखले जाते रविवार पेठ भवानी पेठ सदाशिव पेठ येथील वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाजदा केली नमाज स्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सातारा शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने बकरी उत्साहात साजरी करण्यात आली तसेच प्रार्थना स्थळावरील मौलाना काझी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना बकरीच्या शुभेच्छा दिल्या
बकरी ईदला कुर्बानी दिली जात असल्याने सातारा शहर व जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने कत्तलखान्यांना परवानगी देण्यात आली होती मुस्लिम धर्मीयांच्या श्रद्धेप्रमाणे कुर्बानीचे तीन भाग करून त्यातील दोन भाग हे गरजू लोकांना दिले जातात त्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम बांधवांची नमाज अदा झाल्यानंतर कुरबानीचे वाटप केले सातारा शहरात सकाळपासूनच बकरी ईद सणाचा उत्साह दिसून आला .सातारा शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते पावसाची शक्यता होती मात्र जिल्ह्यात व शहरात कोठेही पाऊस झाला नाही.
No comments