फलटणमध्ये तिरंगा रॅली रद्द – प्रशासनाचा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निर्णय
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ मे २०२५ - जिल्हा प्रशासन, सातारा व पालकमंत्री, सातारा यांच्या सूचनेनुसार फलटण शहरात दि.११ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मात्र सदर तिरंगा रॅली रद्द करण्यात आली.
या रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाच्या मनोबलास चालना देण्याचा उद्देश होता. यासाठी सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते.
मात्र, भारत-पाकिस्तान सीमारेषेवर सध्या निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने नागरिकांना व सहभागी संस्थांना या निर्णयाची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments