Breaking News

अकौटन्सी विषयात शर्वरी अनिल वेलणकरला १०० पैकी १०० गुण

 

Sharvari Anil Velankar scored 100 out of 100 marks in Accountancy.

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ मे २०२५ - फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या शै. वर्ष २०२४- २५ चा इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील वर्षाप्रमाणेच निकालाची परंपरा कायम ठेवून आर्टस्, कॉमर्स, विज्ञान, एम एल टी व  बँकिंग या पाचही शाखेत  बाजी मारली आहे. एच एस सी बोर्ड परीक्षेसाठी आर्टस्, कॉमर्स, विज्ञान शाखेत मिळून एकूण ८२२ विद्यार्थी बसले होते यामध्ये ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष श्रेणी ३५ विद्यार्थ्यांना यामध्ये २ कला शाखेतील विद्यार्थ्यांना,१९ वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना तर १४ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मिळाली. तर प्रथम श्रेणी २२१ विद्यार्थ्यांना मिळाली यामध्ये कला शाखेतील ९,वाणिज्य शाखेतील ८१ तर विज्ञान शाखेतील १३१ विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

    यंदाच्या बारावीच्या (एच एस सी बोर्ड) परीक्षेत मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथून विज्ञान  शाखेतील एकूण ५०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व विज्ञान शाखेचा निकाल ९९.६०% लागला. यामध्ये विज्ञान शाखेतून  सोनवलकर यश  तानाजी यांने ५१३ गुण मिळवत  ८५.५०% प्राप्त करत अव्वल स्थान पटकावले. तर कु. थोरात समृद्धी प्रदीप हिने  ५०० गुण मिळवत ८३.३३%  संपादन करून द्वितीय क्रमांक मिळवला असून कु. राऊत  अंजली दत्तात्रय हिने ४९६ गुण मिळवत ८२.६७%  मिळवून तृतीय स्थान पटकवले आहे. तर कॉमर्स म्हणजेच वाणिज्य या शाखेत.कु.वेलणकर शर्वरी अनिल हीने ५६० गुण प्राप्त करून ९३.३३%  मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले तर  कु.नाळे सिद्धी चंद्रकांत हीने ५२४ गुण प्राप्त करून ८७.३३%  मिळवत दूसरे  स्थान प्राप्त केले व कु.जाधव कीर्ती बच्चाराम हिने ५१६ गुण प्राप्त करून  ८६.००% मिळवत तिसरे स्थान पटकावले.

    तर कला शाखेतून कु.जाधव सुप्रिया नथुराम हिने ५०५ गुण प्राप्त करत ८४.१७% मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले तर आवटे प्रणव हनुमंत  याने ४५४ गुण प्राप्त करून ७१.८३%  मिळवत दूसरे  स्थान प्राप्त केले व कु.कर्चे स्नेहा संतोष हिने  ४३१ गुण प्राप्त करून  ७१.८३% मिळवत तिसरे स्थान पटकावले. तर एम एल टी शाखेमध्ये १० विद्यार्थी बसले होते यामध्ये १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले व या शाखेचा निकाल १००% लागला यामध्ये कु. गुरव शिवानी जगन्नाथ हिने ३७३ गुण प्राप्त करत  ६२.१७%मिळवत संयुक्तरित्या प्रथम क्रमांक प्राप्त केला कु. रिटे सृष्टी संतोष हिने ३७३ गुण प्राप्त करत ६२.१७%मिळवत संयुक्तरित्या प्रथम क्रमांक प्राप्त केला कु. सावंत सानिक संतोष हिने  ३६६ गुण प्राप्त करत  ६१.००%मिळवत दुसरा  क्रमांक प्राप्त केला तर कु. गायकवाड अंकित दिलीप हिने ३६३ गुण प्राप्त करत  ६०.५०%मिळवत तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर बँकिंग शाखेत एकूण ९ विद्यार्थी बसले होते त्यातील ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये कु.घोडके राजेश्वरी मिलिंद हिला ४४६ गुण प्राप्त करत ७४.३३% मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कदम प्रणव प्रमोद  याने ४१७ गुण मिळवत ६९.५०% प्राप्त करत दुसरा क्रमांक पटकावला व कु.लोखंडे रविना दीपक हिने ३७६ गुण प्राप्त करत ६२.६७% मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.

    वरील सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती  मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण -कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार मा.श्री दीपकराव चव्हाण ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो-खो असोसिशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण एजुकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, तपासणी अधिकारी मा.दिलीप राजगुडा , सहायक तपासणी अधिकारी मा.सुधीर अहिवळे,मा.प्राचार्य शेडगे ,ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य मा.सोमनाथ माने,पर्यवेक्षिका माध्यमिक सौ पूजा पाटील,फलटण एजुकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments