फलटण एस.टी. स्टँडवर गर्दीचा फायदा घेत अज्ञातकडून सोन्याचे मिनी गंठण लंपास
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. १६ मे २०२५ - फलटण शहरातील एस.टी. स्टँडवर दि.१३/५/२०२५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 13.80 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी अनुराधा अनिल कदम (वय 41, व्यवसाय - गृहिणी, रा. गिरवी, ता. फलटण) या फलटण ते पुसेगाव बसमध्ये चढत असताना ही चोरी झाली. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मिनी गंठणसह सोनसाखळी लंपास केली.
याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास महिला पोलीस हवालदार माधवी बोडके या करत असून, पुढील तपास सुरु आहे.
No comments