Breaking News

अकरावी प्रवेश प्रक्रीयेसाठी मुधोजी महाविद्यालयामध्ये मोफत ऑनलाइन नाव नोंदणी सुविधा केंद्र उपलब्ध

Free online registration facility available at Mudhoji College for 11th admission process

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. १६ मे २०२५ - फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे इयत्ता अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी निःशुल्क ऑनलाइन नावनोंदणी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. यंदा प्रथमच शासन निर्णयानुसार ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी.एच. कदम यांनी दिली.

    कला, वाणिज्य  व विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. १९ ते २८ मे या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

    फलटण तालुक्यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा  हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय हे नेहमीच कटिबद्ध असून, महाविद्यालयाने गुणात्मक आणि संख्यात्मक दर्जा राखत उज्ज्वल यशाची दीर्घ परंपरा टिकवून ठेवली आहे.महाविद्यालयामधे कला, वाणिज्य, व विज्ञान या  शाखेतून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाची सोय उपलब्ध असून, माहिती तंत्रज्ञान, कम्प्युटर सायन्स या विषयांची निवड करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. महाविद्यालयामध्ये एन.सी. सी. मुले व मुली स्वतंत्र युनिट, तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे व मेस, प्रशस्त ग्रंथालय , भव्य क्रीडांगण,विविध खेळांचे स्वतंत्र मार्गदर्शन, विविध प्रकारच्या सरकारी आर्थिक सवलती व शिष्यवृत्ती, अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा,  तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षांचे केंद्र, डिजिटल क्लासरूम, विविध विषयांवरील चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन, सुसज्ज व्यायामशाळा,  एन .एस. एस., अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना, अशा अत्याधुनिक सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत . या सुविधांचा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे .अधिक माहितीसाठी संपर्क -कला विभाग प्रा. सौ. देशमुख एन.डी.मोब.8668613201, वाणिज्य विभाग प्रा. श्री. शिंदे एम. एस. मोब.-9423781589, विज्ञान विभाग प्रा. सौ भोसले यु. एस. मोब .-7020433774, प्राचार्य प्रो. डॉ. पी.एच .कदम मोब.-8483023741 यांच्याशी संपर्क करण्यात यावे असे आवाहन प्रवेश प्रक्रिया समितीने केले आहे.

No comments