स्वरूपा करिअर अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; प्रा. सोनाली सुरज भिसे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - स्वरूपा करियर अकॅडमी फलटण संचालिका सौ. सोनाली सुरज भिसे यांना महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एव, मध्यम उद्योग मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या टॅलेंट कट्टा या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सौ. सोनाली सुरज भिसे यांनी सैन्य भरती प्रशिक्षण शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने सोनाली सुरज भिसे यांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे.
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एव, मध्यम उद्योग मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या टॅलेंट कट्टा या संस्थेकडून महाराष्ट्ररत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजन पुणे येथे रविवार दि. 25 मे रोजी करण्यात आले होते. या सोहळ्यात साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत्त संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्मानित करण्यात आले आहे.व राष्ट्रभतीने प्रेरित होवून समाजऋण फेडणाऱ्य तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव व भान ठेवून कार्य करणाच्या व्यक्तींचा या सोहळ्यात सुप्रसिध्द अभिनेत्री आर्या घारे, मा.श्री. नितिन धवने पाटील यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ. सोनाली सुरज भिसे यांनी स्वरूपा करियर अकॅडमी फलटणच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा कौशल्य विकास व सैन्य व पोलीस भरतीचे प्रशिक्षण तसेच हजारो विद्यार्थ्यांना करिअर विषयक मोफत मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे नवीन संधी दिलली आहे. यासाठी त्यांचे पती सुरज भिसे यांची मोलाची साथ त्यांना लाभलेली आहे. तसेच अनेक गरीब व गरजू मुलांनाही त्यांनी मोफत प्रशिक्षण दिले आहे. याचीच दखल घेऊन टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक, ग्रामस्थ, व मित्र परिवार यांच्या कडून शुभेच्छा देण्यात येत आहेत व त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होत आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वार रविवार दि. 25 मे 2025 रोजी पत्रकार भवन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ पुणे येथे संपन्न झाला.
No comments