फलटणमध्ये गुटख्याची बेकायदेशीर विक्री उघडकीस - एकावर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ मे २०२५ - जनहित व जनआरोग्यास धोका ठरणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री उघडकीस आली असून, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.२४ मे २०२५ रोजी शुक्रवारी संध्याकाळी सुमारे ६.५० वाजता, फलटण तालुक्यातील जिंती नाका परिसरातील रामा हॉटेल समोरील रामा पानशॉपवर ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत, दिपक कुंभार (वय 42 वर्षे, रा. जिंती नाका, फलटण) या इसमाकडे आरएमडी, विमल पान मसाला आदी प्रतिबंधित गुटखा प्रकारची एकूण 1670 रुपयांची साठवणूक विक्रीच्या उद्देशाने करण्यात आली असल्याचे आढळून आले.
सदर कारवाई अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26 (2)(i), 26 (2)(iv), व 27 (3)(e), 30 (2)(a) तसेच अन्न सुरक्षा व मानदे (प्रतिबंध व मर्यादा) नियमावली 2011 च्या नियम 3.1.7 नुसार करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 अंतर्गतही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments