महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांची दिशा समितीच्या सदस्यपदी निवड
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. 17 मे २०२५ - सातारा जिल्ह्याच्या समन्वय व सनियंत्रण समितीमध्ये (दिशा समिती) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष तथा श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे नियामक मंडळ सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
दिशा समितीचे अध्यक्ष खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सह. अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सदस्य खासदार नितीनकाका पाटील तसच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा सदस्य दिशा समिती व सचिव म्हणून जिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे कमिटीचे प्रमुख कामे आहेत.
केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे. जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, शिक्षण, आरोग्य व इतर अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी या समितीच्या माध्यमातून केली जाते.
No comments