फलटणमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 66 वा स्मृतिदिन साजरा ; सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करत भावपूर्ण आदरांजली
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. 17 मे २०२५ - श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व सौ. वेणूताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 66 वा स्मृतिदिन मोठ्या श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. हे पूजन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, उपाध्यक्ष सी. एल. पवार, मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक प्रा. यादव एस. डी. यांनी करताना कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. रसायनशास्त्राचे प्रा. वाघ जी. बी. यांनी भाऊराव पाटील यांचे जीवनचरित्र थोडक्यात सादर केले, तर प्रा. शेख यांनी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.
बापूसाहेब मोदी यांनी आपल्या मनोगतातून भाऊराव पाटील यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटींच्या आठवणी जागवून उपस्थितांमध्ये प्रेरणा निर्माण केली.
मानद सचिव डॉ. सूर्यवंशी यांनी सोसायटीचा आणि भाऊराव पाटील यांचा ऋणानुबंध उलगडताना, नव्या पिढीने त्यांचे विचार कृतीत आणावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्राचार्य पी. डी. घनवट यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राऊत एस. एन. यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. धुमाळ एस. जी. यांनी केले.
No comments