भारतीय सैन्याच्या उज्ज्वल कामगिरी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फलटणमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ मे २०२५ - पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या उज्ज्वल कामगिरीसाठी आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन फलटण येथे करण्यात आले आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि त्यागाला मानवंदना देण्यासाठी होणारी ही रॅली जनजागृतीसह राष्ट्रभक्तीचे प्रतीक ठरणार आहे.
ही रॅली उद्या, मंगळवार दिनांक २० मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालय परिसरातून सुरू होणार असून, महात्मा फुले चौक, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, महावीर स्तंभ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त होईल.
या रॅलीमध्ये फलटण तालुका आणि शहरातील सर्व नागरिक, विविध सामाजिक संस्था व मंडळे, पदाधिकारी, विद्यार्थी वर्ग, माजी सैनिक संघटना तसेच पोलीस आणि सैन्य भरतीसाठी कार्यरत प्रशिक्षण संस्था यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार अभिजित जाधव व मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.
No comments