फलटण नगरपरिषद प्रभाग क्र.१२ मध्ये लादीकरणाचा शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ मे २०२५ - फलटण नगरपरिषद हद्दीतील हाडको वसाहत, प्रभाग क्र.१२ येथे रस्त्याच्या लादीकरण कामाचा शुभारंभ मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कामात ईरफान शेख यांचे घर ते मिलिंद भोसले, प्रशांत कांबळे यांचे घर ते पंकज शिंदे, प्रकाश पवार ते सचिन सावंत, तसेच कलाल शेख यांचे घर ते चोरमले, आवटे, सस्ते घरापर्यंत लादीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, राहुल निंबाळकर, अमोल सस्ते, संदीप चोरमले, बजरंग गावडे यांची उपस्थिती लाभली.
स्थानिक नागरिकांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत मा. खासदार व आमदारांचे आभार मानले.
No comments