Breaking News

किलीमांजारो शिखर सर करुन निखिल कोकाटे यांची ऐतिहासिक कामगिरी

Nikhil Kokate's historic achievement by scaling Mount Kilimanjaro

    मुंबई, दि. 25 : पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो यशस्वीपणे सर केले आहे. त्यांच्या या मोहिमेसाठी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या तत्परतेने अवघ्या एका दिवसात विभागामार्फत ५ लाख ४० हजार ८०० रु.ची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.

    निखिल कोकाटे यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी अभिनंदन केले आहे. आदिवासी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने आदिवासी विकास विभागाने केलेल्या या सहकार्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी करु शकला अशी प्रतिक्रिया निखिल कोकाटे यांनी दिली. या सहकार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आभार मानले आहेत.

No comments