Breaking News

कोळकीत राजे गटाला धक्का ; कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Raje group office bearers join BJP

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ -माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राजे गटाचे कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैय्या व मा. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष राजन खिलारे, निरंजन निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.

प्रवेशवेळी  मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत केले व कोळकीच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, मा. जिल्हा परिषद  माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब काशिद, रणजितसिह भोसले , रणजीत जाधव, मंगेश नाळे, रियाज इनामदार उपस्थित होते.

No comments