सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 69 टक्के मतदान झाले. आहे.जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या स्वीप कार्यक्रमामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यात प्रशासन यशस्वी झाले. जिल्ह्यातील 3165 मतदान केंद्रावर नेटके नियोजन मनुष्यबळाचा प्रभावी वापर चोख पोलीस बंदोबस्त यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांना केंद्रापर्यंत आणत आपली जबाबदारी पार पाडली त्याचबरोबर प्रशासनाने सुद्धा राबवलेल्या वेगवेगळ्या उपायोजनांमुळे मतदानाचा टक्का सत्तरीपर्यंत येऊन पोहोचला.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 109 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले.यामध्ये 57 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे वाई व पाटण येथे तिरंगी तर सातारा कोरेगाव, माण, फलटण , कराड उत्तर व कराड दक्षिण येथे चुरशीच्या दुरंगी लढती होत आहेत .त्यामुळे मतदानाविषयी कसा प्रतिसाद असेल याची उत्सुकता होती . सकाळी सात वाजल्यापासून जिल्ह्यातील 3165 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या चार तासांमध्ये 18.72% मतदान झाले कोरेगावात चुरशीने मतदान सुरू असून तेथे 21.24% सर्वाधिक मतदान झाले माण तालुक्यामध्ये पहिला टप्प्यात संथ गतीने मतदान सुरू होते सातारा जिल्ह्यात सकाळी सात ते नऊ या वेळेत फलटणला ४.२९ वाई येथे 4.92 कोरेगावला 6.93 माण मध्ये 3 .08 कराड उत्तर मध्ये 4.84 कराड दक्षिण मध्ये 5.63 पाटण मध्ये 7.68 व सातारा मतदारसंघात 6.18 असे मतदान झाले तर सकाळी नऊ ते 11 या वेळेमध्ये जिल्ह्यात 18.72% मतदान झाले होते यामध्ये सातारा 19.97 पाटण 18.93 कराड दक्षिण 19.71 कराड उत्तर 18.57 मान 15.21 कोरेगाव 21.24 वाई मध्ये 18.55 फलटण 17.98 असे मतदान झाले.
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकाळी आठ वाजता सहकुटुंब येथील अनंत इंग्लिश स्कूल मध्ये मतदानाचा हक्क बजावला रिंगणातल्या सर्व उमेदवारांनी त्या त्या विधानसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान प्रक्रिया पूर्ण केली .सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच खरा सामना आहे पाटण आणि वाई या दोन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने अपक्षांनी येथील गणिते बिघडवली आहेत सातारा जिल्हा प्रशासनाने संवेदनशील आणि पैशाचे वाटप होऊ शकणाऱ्या 48 गावांवर ड्रोन कॅमेरा ने लक्ष ठेवले होते दुपारी तीन वाजल्यानंतर मतदानाचा टक्का वाढायला सुरुवात झाली कोठेही मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात येत होती सर्व बूथवर कार्यकर्ते स्वतः जातीने मतदारांना घरातून मतदान केंद्रावर घेऊन जात होते बहुतांश मतदार संघांमध्ये हेच चित्र दिसून आले साताऱ्यात मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याच्या प्रयत्न झाल्याचा आरोप करून युवाशक्ती फाउंडेशनची महारुद्र तिकुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यात सरासरी 53 टक्के मतदान झाले होते जिल्हा प्रशासनाकडून या माहितीला दुजोरा देण्यात आलेला आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांना मतदानाची विशेष सोय करण्यात आली होती सुमारे चौदाशे जेष्ठ मतदारांनी घरातूनच मतदान केले तर ज्यांना शक्य होते अशा दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे सातारा जिल्ह्यात विशिष्ट थीमवर आधारित 100 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती त्यालाही मतदानाचा चांगला प्रतिसाद मिळाला महिगाव तालुका जावळी येथील 92 वर्षाच्या जेष्ठ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील बामनोली गोगवे तसेच चकदेव येथील दुर्गम भागातील मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती एकूण 3165 मतदान केंद्रांवर सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी सी आर पी एफ च्या दोन कंपन्या स्वतंत्रपणे तैनात करण्यात आल्या होत्या त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही सायंकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली मतदार स्लीप वाटणे अथवा मतदार यादीत नाव नसणे अशा किरकोळ तक्रारी सुद्धा प्रशासनाने होऊ दिल्या नाहीत . मतदान केंद्रांवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती मतदार यादी तातडीने नाव शोधून मतदारांना स्लिपा देण्यात येत होत्या त्यामुळे कोठेही मतदानाला उशीर झाला नाही एका वेळी चार मतदार मतदान केंद्रात प्रवेश करू शकतील अशी व्यवस्था होती स्वतंत्र खोल्यांमध्ये खुर्च्यांची व्यवस्था दिव्यांगांसाठी व्हील चेअर त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मेडिकल किट इत्यादी सुविधा असल्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये सुलभता आली मतदान प्रक्रिया संपली तेव्हा सरासरी सातारा जिल्ह्यात 69 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
No comments