Breaking News

निमा रन फॉर हेल्थ 2024 ची नोंदणी प्रक्रिया सुरू

Registration process for Nima Run for Health 2024 begins

    सातारा : येथील पोलिस परेड ग्राऊंडवर निमा रन फॉर हेल्थ 2024 च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा व नोंदणी प्रक्रिया सातारा हील हाफ मॅरेथॉनचे संस्थापक व साताऱ्यातील मॅरॅथॉन चळवळीचे प्रणेते डॉ संदीप काटे यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आली. रविवार 27 ऑक्टोबर, 2024 रोजी साताऱ्यात निमा रन फॉर हेल्थ 2024 संपन्न होत आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून ही रन 10 किमी व 3 किमी या 2 मुख्य प्रकारासह वेगवेगळ्या वयोगटात होणार आहे.

    यावेळी बोलताना डॉ काटे म्हणाले की, रुग्ण आजारी पडल्यानंतर डॉक्टर्स लोकांची रुग्णसेवा नेहमीच करतात. मात्र निमा रन फॉर हेल्थच्या माध्यमातून लोकांनी आजारीच पडू नये, यासाठी देखील डॉक्टर्स प्रयत्न करीत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे डॉ काटे यांनी नमूद केले. तरी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच निमाचे अध्यक्ष डॉ अनिल शिंगे व निमा रन फॉर हेल्थ 2024 चे अध्यक्ष डॉ सुधीर पवार यांनी स्पर्धेविषयी उपस्थितांना माहिती दिली. याठिकाणी उपस्थित धावपटूंनी नोंदणी प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे पहिल्या दिवशीच 500 नोंदणी फॉर्म्सचे वितरण झाले.

    नोंदणी प्रक्रियेची घोषणा करताना उ‌द्घाटक डॉ संदीप काटे यांच्यासह डॉ दीपक बनकर, पंकज नागोरी, डॉ देवदत्त देव, डॉ अश्विनी देव, डॉ कैलास खडतरे, डॉ दीपक थोरात यांच्यासह सातारा हील मॅरेथॉनचे सर्वच आयोजक उपस्थित होते. तसेच निमाचे अध्यक्ष डॉ अनिल शिंगे, खजिनदार डॉ सुधाकर लाड, डॉ अभिराम पेंढारकर, निमा रन फॉर हेल्थ 2024 चे अध्यक्ष डॉ सुधीर पवार, रेस डायरेक्टर डॉ दयानंद घाडगे, रेस सेक्रेटरी डॉ शुभांगी गायकवाड, रेस कोऑर्डीनेटर डॉ सुनिता चव्हाण व साताऱ्यातील धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments