Breaking News

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना पोस्टात खाते उघडण्याचे आवाहन

Appeal to open account in CM-My Beloved Sister Yojana post

    सातारा दि. 5:   मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा पोस्टमन बरोबर संपर्क साधून आपले हे खाते उघडून घ्यावे आणि या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीची पूर्तता करावी असे आवाहन पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल   रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.

    इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे हे 'थेट लाभ हस्तांतरण' (Direct Benefit Transfer) सक्षम बैंक खाते उघडल्यामुळे महिलांना सरकार मार्फत 'थेट लाभ हस्तांतरण' योजनेअंतर्गत   योजनांचे लाभ मिळू शकतील. यासाठी महिलांनी स्वतः जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये केवळ आपले आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच ज्या खातेधारकांनी अद्याप आधार क्रमांक संलग्र केला नसेल अशा सर्व खातेदारांनी देखील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा पोस्टमन बरोबर संपर्क साधून आपले इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये उघडलेले खाते आधार संलग्न करून घ्यावे असेही आवाहन  श्री.  जायभाये यांनी केले आहे.

No comments