फलटण ग्रामीण पोलिसांने शोधले ४ लाख ६० हजार रुवयांचे २० स्मार्ट फोन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.24 - मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. आणि तो हरवला किंवा चोरीस गेला तर मनाला हुरहूर लागणारच. दिवसेंदिवस मोबाईल चोरीच्या व हरवण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधण्याची मोहीम हातात घेतली, या मोहिमेअंतर्गत आत्ता २० स्मार्टफोन शोधून काढले व ते संबंधित मालकांना परत दिले. शोधलेल्या मोबाईलची किंमत ४ लाख ६० हजार रुपये आहे. या अगोदरही ग्रामीण पोलिसांनी ३० मोबाईल फोन शोधून काढले होते.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलिस उपनिरीक्षक बदने, पोलीस हवालदार तात्या कदम, अमोल जगदाळे, नितीन चतुरे, नवनाथ दडस, वैभव सूर्यवंशी यांनी केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे मधील दाखल गहाळ, हरविले मोबाइलचा शोध घेवून ते संबंधितांना परत देण्यात आले. १) विकास विलास नांदले रा.धुळदेव ता फलटण जि. सातारा २) शांताराम मल्हारी लोणकर रा साखरवाडी ता. फलटण जि सातारा ३) हणमंत भगवान गोफणे रा जावली ता फलटण जि. सातारा ४) धिरज आबासो पवार रा राजुरी ता फलटण जि.सातारा ५) लहु किसन दिघे रा. मोझरी ता. फलटण जि.सातारा ६) ओमप्रकाश यादव रा. पिंप्रद ता. फलटण जि.सातारा ७) लालचंद सैनी रा. पिंप्रद ता. फलटण जि.सातारा ८) दत्तात्रय बवन खरात रा सांगवी ता फलटण जि.सातारा ९) मुख्तार अन्सारी रा. सुरवडी ता. फलटण जि.सातारा १०) जितेंद्र साव मुळ रा. झारखंड सध्या रा.सुरवडी जि.सातारा ११) ओंकार नंदकुमार जाधव रा सुरवडी ता. फलटण जि.सातारा १२) मयुर नानासी बनसोडे रा. कोळकी ता. फलटण जि.सातारा १३) सतीश जाधव रा. मिरढे ता. फलटण जि. सातारा १४) बाळासो खशाबा शिंदे रा. साठेफाटा जि.सातारा १५) महेश तुकाराम निकम रा.सांगवी ता. फलटण जि.सातारा १६) प्रकाश युवराज ठणके राः मुजवडी ता. फलटण जि.सातारा १७) प्रभा दिनेश पाचपोर रा. मांजरी पुणे १८) संतोष अरविंद घारगे रा सुरवडी ता. फलटण जि.सातारा १९) दत्तात्रय तुकाराम जाधव रा.आदर्की ता. फलटण जि.सातारा २०) सचिन बाळासो टेवरे रा.वरड ता. फलटण जि.सातारा वरील प्रमाणे हरविलेले / गहाळ झाले मोबाईल मिळवले आहेत. शोधलेल्या 20 मोबाईलची एकूण किंमत ४,६००००/- रु. आहे.

No comments