Breaking News

जनतेने मला उमेदवारी दिली असल्यामुळे जनता मला निवडून आणेल - धैर्यशील मोहिते पाटील

The people will elect me because the people have nominated me - the Dhairysheel Mohite Patil

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ -  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे मतदान केल्यानंतर फलटण शहरासह माढा लोकसभा मतदारसंघात विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदानाची माहिती घेतली.

    माढा लोकसभा मतदारसंघात चांगली परिस्थिती असून, चांगले मतदान सर्वत्र चालले आहे. लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदान करत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. मतदान केंद्रावर महिलांचा प्रतिसाद जास्त असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील त्यावर मिश्किलपणे म्हणाले की, गॅसच्या किंमती वाढल्यामुळेच महिला, हे सरकार घालवण्यासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदान करत आहेत.

    मला जनतेने उभं केलेलं आहे, जनतेने माझी उमेदवारी जाहीर केली असल्यामुळे मला जनता निवडून आणेल, असा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त करून,  या भागात पाणी, सिंचनाचे प्रश्न आहेत, रेल्वेचे प्रश्न आहेत, फलटण - पंढरपूर रेल्वे, कुर्डूवाडी वर्कशॉपचे प्रश्न आहेत, रेल्वे पोलीस दलाचे सेंटर हलवण्यात आले आहे. कृष्णा भीमा स्थैरीकरण,  तसेच प्रत्येक तालुक्यात सिंचनाचे अर्धवट प्रकल्प आहेत, फूड प्रोसेसिंग योजना तसेच उच्च शिक्षण असे बरेच प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मी जनतेला दिले आहे आणि जनतेने मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.  मतदानाच्या रूपाने ते प्रत्यक्षात येईल. लोकप्रतिनिधी  झाल्यानंतर सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे पूर्ण करणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

No comments