Breaking News

सातारा विभागाची डाक अदालत 10 जून रोजी

Dak Adalat of Satara Division on 10th June

    सातारा दि. 28 (जिमाका) : प्रवर अधिक्षक डाकघर सातारा, सातारा विभाग, सातारा 415001 द्वारा दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर सातारा विभाग, सातारा 415001 यांच्या कार्यालयामध्ये 100 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

    या डाक अदालतमध्ये सातारा विभागातील संबंधित पोस्टाच्या कार्यपद्धती विषयी किंवा कामकाजाब‌द्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बैंक व मनिऑर्डर बाबतच्या, तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीला सह केलेला असावा उदा तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नांव व हृदद इत्यादी संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार प्रवर अधिक्षक डाकघर सातारा, सातारा विभाग, सातारा 415001 यांचे नावे दोन प्रती मध्ये दिनांक 5 जून 2024 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे प्रवर अधिक्षक डाकघर सातारा सातारा विभाग, सातारा यांनी कळविले आहे.

No comments