Breaking News

बीआरएस पक्षातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांचा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा

The office-bearers of various cells in the BRS party. Support to Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.29 - माळशिरस, नातेपुते, सदाशिवनगर पंचक्रोशीतील बीआरएस पक्षातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांना साथ देत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देत, त्यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले  आहेत. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी नातेपुते ,  माळशिरस,  सदाशिवनगर पंचक्रोशीतील  भाजपच्या निष्ठावतांनी सुरूवातीपासून विजयासाठी कंबर कसली आहे. तर आता बीआरएसचे विविध पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  केलेली विकासकामे पाहून  देशात भाजपचेच सरकार येणार, पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत. यामुळे बीआरएस तालुकाध्यक्ष अशोक भोसले व ओबीसी सेलचे अध्यक्ष शंकरराव बनकर यांनी आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला. याबद्दल त्यांचे स्वागत फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा,  नगरसेवक अजय माळवे,  सुधीर अहिवळे,  फलटण शहर वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. अनिल श्रीवास्तव यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले.

No comments