Breaking News

पिरॅमिड चौक फलटण येथे मतदाना बाबत जनजागृती मोहीम

Public awareness campaign regarding voting at Pyramid Chowk Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीचे विविध कार्यक्रमा मार्फत जन जागृतीच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्विप अंतर्गत काम सुरू आहे.

    मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, फलटण सचिन ढोले साहेब, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव साहेब, श्री एस. के .कुंभार सहाय्यक गटविकास अधिकारी फलटण स्विप पथक प्रमुख शहाजी शिंदे, पूजा दुदुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्विप अंतर्गत मतदारा मध्ये मतदानाबाबत जनजागृती चे काम सुरू आहे. पिरॅमिड चौक ईशान्य बजार येथे स्वीप अंतर्गत मार्फत मतदार जागृती करण्यात आली.

    माढा  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण विधानसभा मतदारसंघ येथे मतदारा मधे मतदान जनजागृती घेण्यात आली.

    यावेळी मतदारांमध्ये मतदान करण्याबाबतचे संकल्प पत्र माहिती देऊन मतदारांनी मतदान करण्याबाबत संकल्प आमचा १०० टक्के मतदानाचे पत्र भरून  दिले. दि.७ मे २०२४ रोजी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन स्विप सहाय्यक सचिन जाधव यांनी केले व मतदारांची मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी संगिनी फोरमच्या अध्यक्षां सौ. अपर्णा जैन, माजी अध्यक्ष सौ नीना कोठारी, माजी सचिव पोर्णिमा शहा, संगिनी सचिव सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ. मनीषा घडिया , जैन सोशल ग्रुप उपाध्यक्ष श्रीपाल जैन,श्रेयांश जैन व संगिनि सदस्या  तसेच इतर महिला मतदार उपस्थित होत्या.

No comments