खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील प्रचाराचा शुभारंभ
eat Ranjitsinh Naik Nimbalkar's campaign in Phaltan begins
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - माढा लोकसभा मतदार संघातील महायुती व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सद्गुरु हरिबुवा मंदिर येथे प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी खा.रणजितसिंह यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली.
सद्गुरू हरिबुवा मंदिर, मलठण, फलटण येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सौ. मानिषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर,माजी नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर,मा.नगरसेवक व गटनेते अशोकराव जाधव, माजी नगरसेवक अनुप शहा, सचिन आहिवळे, ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर, इंदिराराजे नाईक निंबाळकर, रणवीरराजे समशेरसिंह नाईक निंबाळकर,भाजपाच्या महिला अध्यक्षा सौ. उषा राऊत, विविध पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर मलठण परिसरात पदयात्रा काढण्यात आली.
No comments