डॉ. प्रसाद जोशी यांना बेस्ट आर्थोपेडीक सर्जन पुरस्कार जाहीर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३१ : जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणचे सर्वेसर्वा, प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांचे भारतीय वैद्यक पुरस्कार २०२४ साठी (Indian Medical Awards 2024) सर्वोत्कृष्ट अस्थिरोग तज्ञ (Best Orthopedic surgeon) म्हणून नामनिर्देशन झाले आहे.
ग्रामीण भारतामध्ये विशेषत: फलटण, महाराष्ट्र या भागात त्यांनी केलेल्या कामाची नोंद घेऊन हे नामांकन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठेच्या व सन्मानाच्या पुरस्कारासाठी डॉ. प्रसाद जोशी यांचे नामांकन झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
सदर पुरस्कार वितरण मे २०२४ मध्ये म्हैसूर येथील खास समारंभात होणार असून त्यावेळी सदर पुरस्कारासोबत डॉ. जोशी यांना भारतातील सर्वात विश्वसनीय डॉक्टर (Most Trusted Doctor) हा सन्मान बहाल करण्यात येणार आहे.
हा आम्हा सर्वांसाठी एक मोठा गौरवाचा क्षण असल्याचे नमूद करीत गेली २३ वर्षे एक अस्थिरोग तज्ञ म्हणून केलेल्या अत्यंत विश्वसनीय व समर्पित सेवेचे हे फलित असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.
यासाठी माझी जीवन साथी डॉ. सौ. प्राची जोशी हिचे आभार. माझे पालक, विशेषतः ३५ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मला भक्कम पाठिंबा देणारी माझी आई, मला सदैव पाठिंबा देणारा माझा भाऊ प्रसन्न जोशी याचे आभार.
माझे पाठीराखे, तत्त्वचिंतक व मार्गदर्शक कै. पराग शंकर भिडे यांनी मला एक परिपूर्ण अस्थिरोग तज्ञ म्हणून घडविले त्यांचेही मनापासून आभार. माझ्याबरोबर समर्पित वृत्तीने काम करणारे माझे सर्व सहकारी व माझे आर्थोपेडीक क्षेत्रातील सहकारी यांनी मला सर्व प्रकारची साथ दिली त्यांचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून माझ्याकडे उपचार घेणारे सर्व पेशंट्स व सर्वात महत्त्वाचे माझ्या हातून हे कार्य घडवून आणणाऱ्या परमेश्वराचे मनःपूर्वक आभार अशा शब्दात डॉ. प्रसाद जोशी यांनी पुरस्कारासाठी नामांकन झाल्याचे जाहीर होताच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
No comments