Breaking News

मनोहर जोशी सर यांच्या निधनामुळे दिलदार मित्र गमावला - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar's tribute to Manohar Joshi

मनोहर जोशी यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची श्रध्दांजली

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी सर यांच्या निधनामुळे माझ्या व्यक्तिगत व सार्वजनिक आयुष्यातला चांगला व दिलदार मित्र गमावला असल्याची भावना विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे व्यक्त केली.

     उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत आणि वक्तृत्वाने परिपूर्ण असणारे मनोहर जोशी हे महाराष्ट्रातील एक व्यासंगी व्यक्तिमत्व होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती मी करू शकलो ते मनोहर जोशी होते म्हणूनच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कृष्णा खोऱ्याच्या निर्मितीची महती पटवून देण्यात मनोहर पंतांनी केलेली शिष्टाई मी विसरू शकणार नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत कृष्णा खोऱ्याची निर्मिती झाली. आज दुष्काळी भागामध्ये सर्वत्र पाणी पोहोचत आहे त्याचे बरेचसे श्रेय मनोहर जोशी यांच्या दूरदृष्टी व सहकार्याच्या भावनेला जाते अशी भावना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे व्यक्त केली.

No comments