मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाला फलटणमध्ये सुरवात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ जानेवारी - फलटण तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाला प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाला फलटण तालुक्यात सुरवात झाली असून, या सर्व प्रक्रियेवर तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. या सर्वेक्षणासाठी ९०० पेक्षा जास्त कर्मचारी समाविष्ट केले असून, ३१ जानेवारी अखेर हा सर्व्हे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कळवले आहे.

No comments