फलटणचे तलाठी व मंडलाधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - वडिलोपार्जित जमीनीचे वाटणीपत्र झाले असुन, त्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लोकसेवक तलाठी श्रीमती रोमा कदम व लोकसेवक मंडलाधिकारी जितेंद्र कोंडके यांनी तक्रारदार यांच्याकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांना रंगेहाथ सापडले असून, दोघांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे वडिलोपार्जित जमीनीचे वाटणीपत्र झाले असुन, त्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी, लोकसेवक तलाठी कदम यांनी स्वतःसाठी ३,०००/- रुपये व लोकसेवक सर्कल कोंडके यांचेसाठी १०,०००/- रुपये अशी एकुण १३,०००/- रुपयांची लाच मागणी केली होती.

No comments