सुरवडी येथे बैलगाडा शर्यत ; १५ जणांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - बैलगाडा शर्यत भरवताना शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग करून, सुरवडी ता. फलटण गावच्या हद्दीत बैलगाडा शर्यत भरवून, लंपी चर्मरोग हा संसर्गजन्य रोग पसरवण्यास कारणीभूत होणारी कृती केल्या प्रकरणी १५ जणांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) रवींद्र तायाप्पा चौगुले २) संभाजी बिराप्पा केंगार ३) तुषार सोमनाथ करे ४) सोनू दगडे ५) सुरेश बाळासाहेब जाधव ६)वैभव खंडेराव जाधव ७)स्वप्निल संजय जगदाळे ८)अजित मल्हारी जाधव ९) कोंडीराम बापू जावळे १०) सुहास रोहिदास जाधव ११) गणेश दत्तात्रय मदने १२)मंगेश बन्याबा जाधव १३)अविनाश दत्तात्रय जाधव १४)सागर काशिनाथ मदने १५) दादा मदने यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील पैकी सहा ते दहा संशयित आरोपींनी, जिल्हाधिकारी सातारा यांनी लंपी चर्मरोग या आजाराच्या अनुषंगाने बैलगाडा शर्यत भरवताना घालून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग करून दिनांक १७/११/२०२३ रोजी ३.०० वाजण्याच्या सुमारास सुरवडी ता. फलटण गावच्या हद्दीत कमिन्स कंपनीचे पश्चिमेकडील मोकळ्या जागेत, बैलगाडा शर्यत भरवून लंपी चर्मरोग हा संसर्गजन्य रोग पसरवण्यास कारणीभूत होणारी कृती केली आहे. तसेच सदर शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्या बैलांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांना निर्दयपणे व कृतीने शर्यतीमध्ये पळविले आहे. वरील आरोपींपैकी अनुक्रमांक एक ते पाच या वाहन चालकांनी कोणताही परवाना व प्रमाणपत्र नसताना त्यांच्याकडील वाहनांमध्ये बैलांना निर्दयपणे व कृतीने सदर ठिकाणी आणल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकुण१५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार व्ही आर सूर्यवंशी हे करीत आहेत.
No comments