वीज मीटर बाहेर काढण्याच्या मनमानी कारभारास आम्ही विरोध करणार - नागरिक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मंगळवार पेठ,फलटण येथे घरगुती वीज ग्राहकांचे मीटर, बाहेर काढण्याचे काम महावितरण कडून चालू आहे, मात्र वीज मीटर बाहेर काढण्यास मंगळवार पेठेतून विरोध होत असून, वीज मीटर बाहेर काढण्याच्या, महावितरणच्या मनमानी कारभारास आम्ही विरोध करणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांच्यातून उमटत आहेत.
महावितरण कर्मचारी घरातील वीज मीटर ग्राहकांना न विचारता बाहेर काढू लागल्याने, मंगळवार पेठेतील नागरिक संतप्त झाले होते. यावेळी राग अनावर झालेल्या नागरिकांनी वीज कर्मचाऱ्यांना या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यामुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी महावितरण कर्मचाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत वीज अधिकाऱ्यांनी मीटर बाहेर काढण्याअगोदर आम्हाला विचारले होते का? असे सवाल करत आपापल्या घरातील मीटर बाहेर काढण्यास मनाई केली. त्यामुळे महावितरण कर्मचारी व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
No comments