Breaking News

फलटण येथे वादळी वारे ; विमानतळावर प्रचंड धुळीची लोट ; हातगाडे, टपऱ्यांचे नुकसान

Stormy winds at Phaltan; Heavy dust at the airport; Loss of shops

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ जून - फलटण शहर, जाधववाडी, कोळकी परिसरात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने थैमान घातले.  या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्ज उखडले, पान टपऱ्या, हातगाडे रस्त्यावर पडले, झाडाच्या फांद्या तुटल्या असून, वादळी वाऱ्याने जमिनीपासून ४०- ५० फुटांपर्यंत मातीचे लोट उसळले होते.  तर रविवार बाजारात बसलेल्या भाजी विक्रेत्यांची या वादळी वाऱ्याने  दैना उडवली, भाजीपाला,  छत्र्या, खुर्च्या उडून दुसरीकडे जाऊन पडले होते.

    आज रविवार दिनांक ४ जून रोजी ४ वाजण्याच्या सुमारास फलटण शहर तसेच जाधववाडी, कोळकी या परिसरामध्ये वादळी वारे सुटले. विमानतळ परिसरात वादळी वाऱ्या मुळे ४० ते ५० फूट उंचीचे  धुळीचे लोट उडाले. त्यामुळे जाधववाडी परिसरात सर्व ठिकाणी मातीच माती झाली आहे.  वादळी वाऱ्याने कुरवली रस्त्यालगत असणारी पानाची टपरी रस्त्यावर येऊन पडली असून पान टपरीतील साहित्य रस्त्यावर पडले आहे.  या भागात असणारे होर्डिंग्ज, बॅनर हे देखील पडले असून झाडाच्या फांद्या तुटल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या  जयंतीनिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथे उभारण्यात आलेलले भव्य प्रवेशद्वार उखडून पडले आहे. तर रविवार बाजारामध्ये भाजी विक्रेत्यांची या वाऱ्यामुळे दैना उडाली. उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी लावलेल्या छत्र्या उडाल्या तर काहींच्या खुर्च्या रस्त्यावर पडल्या. मुधोजी हायस्कुल समोरील हातगाड्यांवर झाडाची फांदी पडून नुकसान झाले. वादळी वाऱ्यानंतर या परिसरातील वीज खंडित करण्यात आली होती.

No comments