Breaking News

फलटण तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Reservation for Sarpanch posts of 131 Gram Panchayats in Phaltan Taluka announced

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ जुलै २०२५ - फलटण तालुक्यातील सन २०२५ - २०३० या कालावधीत होणाऱ्या  १३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गाव निहाय सरपंच पदाचे आरक्षण आज सजाई गार्डन, जाधववाडी, फलटण येथे प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली, तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसिलदार तुषार गुंजवटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

    अनुसूचित जमाती प्रवर्ग सर्वसाधारण - ढवळेवाडी (आसू).

    अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्ग - महिला - वेळोशी, शिंदेनगर, गुणवरे, खुंटे, राजुरी+भवानीनगर, निंबळक + वाजेगाव, आसू, दालवडी, माळेवाडी, मिरेवाडी (दा) या १० ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

    अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्ग - सर्वसाधारण - जिंती, पवारवाडी, गोखळी, मुंजवडी, सरडे, निंभोरे, विंचूर्णी, हनुमंतवाडी, खामगाव या ९ ग्रामपंचायती अनुसूचित जाती प्रवर्ग सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

    नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) प्रवर्ग - महिला - वाघोशी, भाडळी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, आदर्की बुद्रुक, तांबवे, नाईकबामवाडी, टाकुबाईचीवाडी, मलवडी, पाडेगाव, शेरेशिंदेवाडी, बोडकेवाडी, जोर वाखरी, जोर कुरवली, साठे, ठाकूरकी, मिरगाव, उपळवे, झडकबाईचीवाडी या १८ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

    नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) प्रवर्ग - सर्वसाधारण - हिंगणगाव, काशीदवाडी, शेरेचीवाडी, विठ्ठलवाडी, राजाळे, तरडफ, मठाचीवाडी, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शिंदेमाळ, वाखरी, कुसुर, धुळदेव, खडकी, परहर खुर्द या १७ ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

    खुला प्रवर्ग - महिला - सांगवी, भिलकटी, खटकेवस्ती, कुरवली खुर्द, सासकल, आळजापूर, कुरवली बुद्रुक + दत्तनगर, वडले, चौधरवाडी, विडणी, टाकळवाडे, आंदरुड, खराडेवाडी, कापशी, आरडगाव, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, मिरढे, चव्हाणवाडी, चांभारवाडी, वाठार निंबाळकर, जाधववाडी (आ), सासवड, फरांदवाडी, मिरेवाडी (कुसूर), कोऱ्हाळे, डोंबाळवाडी, घाडगेमळा, ढवळेवाडी (निं), पिराचीवाडी, मानेवाडी, दच्याचीवाडी, गोळेगाव, परहर बुद्रुक, बरड, गोळेवाडी या ३८ ग्रामपंचायती खुला प्रवर्ग सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

    खुला प्रवर्ग - सर्वसाधारण - सोनगाव, सस्तेवाडी, जावली, गिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, भाडळी खुर्द, होळ, आदर्की खुर्द, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, कोळकी, मुरूम, दुधेबावी, बीबी, कांबळेश्वर, पिंपरद, अलगुडेवाडी, शेरेचीवाडी (हिं), तीरकवाडी, नांदल, फडतरवाडी, कोरेगाव, वडजल, तावडी, जाधववाडी (फ), मुळीकवाडी, घाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माझेरी, निरगुडी + मांडवखडक, ढवळ, शिंदेवाडी, सोमंथळी, सालपे या ३८ ग्रामपंचायती खुला प्रवर्ग सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

No comments