Breaking News

जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कुल पाडेगावचा १० वी चा निकाल शंभर टक्के


New English School Padegaon 10th result hundred percent

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ जून - जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कुल पाडेगाव या शाखेचा इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागला आहे.  १० वी च्या परीक्षेत कु शिवाली तुषार डोंबाळे  हिने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.  तन्मय दत्तात्रय कचरे याने ८६ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर  प्रतिक गजानन अडसूळ याने ८५.६० टक्के गुण  मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. 

    दहावीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  सह्याद्रीभैय्या  चिमणराव कदम , सचिव शारदादेवी कदम (काकी), शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष   लकडे आप्पा, उपाध्यक्ष शेखर काका खरात , ग्रामपंचायत पाडेगावचे सरपंच  राहुल कोकरे आणि सर्व विद्यमान सदस्य, पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ रेखाताई खरात, पाडेगाव सोसायटीचे विद्यमान चेअरमन शिवप्रसाद कर्णवर आणि सर्व संचालक,  श्री बाबासाहेब खरात, माजी सरपंच सौ स्मिताताई खरात ,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक अण्णा खरात, श्री  वसंतराव मोरे, अमरसिंह बुरुंगले, पत्रकार  प्रशांत ढावरे, श्री दशरथ आबा मोहिते , श्री बिपीन दादा मोहिते, श्री नितीनभैय्या जगताप, श्री गिरीश बनकर, श्री  शंकर दडस,  विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री भरत अहिवळे,  विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

No comments