Breaking News

सह्याद्रीभैय्या कदम यांच्या वाढदिवस निमित्त ढवळपाटी येथे कुस्त्यांचे जंगी मैदान

On the occasion of Sahyadribhaiyya Kadam's birthday, wrestling was organized at Dhavalpati

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ जून - युवा नेते सह्याद्रीभैय्या चिमणराव कदम यांचा वाढदिवस ४ जून रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दि.३ जून रोजी ढवळपाटी ता.फलटण येथे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले आहे. तालुक्यातील पैलवानांनी या भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानात सहभाग घ्यावा असे आवाहन सह्याद्रीभैय्या कदम युवा मंच फलटण व जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान युवा नेते सह्याद्रीभैय्या कदम हे वाढदिवसानिमित्त रविवार दि. ४ जून रोजी सकाळी ९.३० पासून आपल्या सूर्य निवास, कमला निंबकर शाळेनजिक, लक्ष्मीनगर, फलटण येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

    ढवळपाटी, ता. फलटण येथे आयोजित केलेल्या भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदान दुपारी ४ वाजल्यापासून सुरू होईल. यावेळी तालुक्यातील पैलवानांसह बाहेरील पैलवानांच्या कुस्त्या प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहेत. शनिवार दि. ३ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या खेळाडूंच्या कुस्त्या जोडल्या जातील व दुपारी ४ वाजल्या पासून कुस्त्या सुरू होतील. अधिक माहितीसाठी पै. अजय कदम सर ८०३७३११३४१, पै. हिंदुराव लोखंडे सर ८७६६९८२२८९, पै. शंभू दडस सर ८३०८४५३१६४ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

No comments