Breaking News

अल्पवयीन मुलीचा पाठलाग ; दोन युवकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

Stalking a minor girl; Two youths charged under POCSO

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ मे - आयआयटी लक्ष्मीनगर येथे क्लाससाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा व तिच्या मैत्रिणीचा विनयभंग करून, पाठलाग केल्याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध पोक्सो व आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, फलटण एसटी स्टँड येथून आयआयटी लक्ष्मीनगर येथे क्लाससाठी पीडित मुलगी व तिची मैत्रीण चालत येत असत, दि. १२ मे २०२३ ते दिनांक २० मे २०२३ रोजी  रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान वेळोवेळी एसटी स्टॅण्ड ते आयआयटी लक्ष्मीनगर फलटण येथे  क्लास पर्यंत, आदित्य नारायण पवार व अक्षय पिलाजी आवटे दोन्ही रा. सुरवडी ता.फलटण जि. सातारा यांनी स्प्लेंडर मोटार सायकल एमच ११ इएच ४१०६ व टिव्हीएस मोटार सायकल वरून पाठलाग करून, हॉर्न वाजवून पीडित मुलीला टोमणा मारून, पीडित मुलगी व तिची मैत्रिण यांचा विनयभंग केला असल्याची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या करीत आहेत.

No comments