'गंधवार्ता' च्या श्रीमंत रामराजे वाढदिवस विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
![]() |
विशेषांकाचे प्रकाशन करताना विधान परिषदेची माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ एप्रिल - महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुणे येथील निवासस्थानी तर फलटण येथे आमदार दिपकराव चव्हाण व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते 'गंधवार्ता' च्या श्रीमंत रामराजे वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी जि. प.सदस्य दत्ताबापू अनपट, सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विशाल पवार, किरण साळुंखे पाटील, भाऊ कापसे, तुषारभैय्या नाईक निंबाळकर, महेश सुतार व दैनिक गंधवार्ताचे संपादक ॲड. रोहित अहिवळे उपस्थित होते.
![]() |
विशेषांकाचे अवलोकन करताना विधान परिषदेची माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर |
'गंधवार्ता' च्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन झाल्यानंतर, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेषांकाचे अवलोकन करून गंधवार्ताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही विशेषांकाचे अवलोकन गंधवार्ताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
![]() |
विशेषांकाचे अवलोकन करताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (छाया - योगायोग फोटो) |
No comments