Breaking News

मुधोजी महाविद्यालयात कीर्तन ; संत व आई वडील हीच आपली दैवते

Kirtan at Mudhoji College; Saints and parents are our gods

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागाने परमपूज्य उपळेकर महाराज मंदिर ट्रस्ट देवाण-घेवाण विषयक करार केलेला असून, त्या अंतर्गत १५ मार्च २०२३ रोजी महाविद्यालयात ह भ प रामदास महाराज कदम यांचे कीर्तन आयोजित केले होते.तत्त्वज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने  कीर्तनासारखा कार्यक्रम प्रथमच  मुधोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. 

    याप्रसंगी प्रा. रामदास महाराज यांनी युवा पिढीला काळाला साजेसे मार्गदर्शन केले. रामदास महाराज म्हणाले आजच्या युवकांनी प्रेम म्हणजे काय हे समजून घ्यावे व खरे प्रेम आपले दैवत असणाऱ्या आई-वडिलांवर करावे. आई वडीलाना दैवत मानावे,कारण देव अन्यत्र नसून साक्षात आई-वडिलांमध्येच असतो, असे सांगून त्यांनी आपल्या नर्म विनोदाने तरुणांपुढे संतांचे जीवन चरित्र उलगडून दाखवले. काळ कोणताही असला तरी संतांचे जीवन हेच खरे आपले मार्गदीप ठरू शकते असे सांगितले. युवकांनी सामाजिक आणि कौटुंबिक भान ठेवत वागले पाहिजे. आपले आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत समाज आणि आई वडील हीच आपली दैवते होत, त्यांना पुढे ठेवून आपण आयुष्यात वाटचाल केली पाहिजे असेही सांगितले.

     महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच सुश्राव्य अशा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. तत्त्वज्ञानासारख्या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी सामाजिक अध्यात्मिक दृष्टिकोन विकसित करून समाजामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणू शकतात. किर्तन हे एक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम समाजमान्य असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार कीर्तनकार समाजातील सर्वच घटकांना प्रबोधन करू शकतात असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ. पी.एच. कदम यांनी केले.

     ह भ प रामदास महाराजांना यावेळी भोसले महाराज, खांडे महाराज, माऊली महाराज, यांनी  समर्थ टाळ व गायनाची साथ दिली तर ओंकार दाणे आणि अनिकेत जाधव या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  मृदंग वादनाची उत्कृष्ट साथ दिली.

     कार्यक्रमाला प पू गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेचे ,उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध रानडे साहेब मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. किर्तन समारंभाचे प्रास्ताविक डॉ. नवनाथ रासकर यांनी केले तर तर आरंभी सर्व उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत उपप्रचार्य डॉ. दीक्षित एस जी यांनी केले.आभार प्रा सतीश पवार यांनी मानले,तर सूत्रसंचालन प्रा अभिजित धुलगुडे यांनी केले कीर्तनाच्या या कार्यक्रमास  डॉ. पी आर पवार , डॉ. टी पी शिंदे डॉ. ए एस टीके. डॉ. ए एन शिंदे.डॉ.सौ एस.एल.नाईक निंबाळकर व अन्य प्राध्यापक वृंद आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments