Breaking News

मठाचीवाडी येथे ४ ठिकाणी घरफोडी

Burglary at 4 places in Mathachiwadi

    फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - मठाचीवाडी तालुका फलटण येथे आज्ञात चोरट्याने बंद घराचे लॉक कटावणीच्या साहाय्याने उचकटून घरातील लोखंडी वस्तू तसेच गावातील इतर तीन ठिकाणी घरफोड्या करून  तेथील साहित्य व रोख रक्कम असा एकूण ४५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेले आहे.

    तुकाराम गणपत भांडवलकर रा. मठाचीवाडी ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की,   दि. २३ मार्च २०२३ रोजी रात्री १२ ते २४ मार्च २०२३ ,रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान मठाचीवाडी तालुका फलटण येथील तुकाराम गणपत भांडवलकर  यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप कटावणी सारख्या हत्याराने उचकटून, दरवाजा उघडून आत प्रवेश करून, स्वयंपाक खोलीतील लोखंडी वस्तू कपाटातून चोरून नेल्या आहेत.  तसेच याच कालावधीत गावातील १) मोहन दिनकर जाधव यांचे दुकान फोडून ३०० रुपये २) बजरंग पांडुरंग खाडे यांचे घर फोडून २५ हजार रुपये, ३) किरण हनुमंत धुमाळ यांचे घर फोडून १९ हजार रुपये असा एकूण ४५ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम आज्ञा चोरट्यांनी चोरून नेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे हे करीत आहेत.

No comments