Breaking News

एखाद्याच्या अन्नामध्ये माती कालवणे अत्यंत चुकीचे - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

High Court order to remove seal of Atharva Sweet Home

    अथर्व स्वीट होमचे सील काढण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ जानेवारी - अथर्व स्वीट होम या दुकानात सर्व नाशवंत माल होता, आणि नगरपालिकेने फारसा वेळ न देता, दुकान सील केल्यामुळे, अमोल भोईटे हे उच्च न्यायालयात गेले, त्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय हा स्वागतार्ह  असून, नगरपालिकेने नियमांना अनुसरून अमोल भोईटे यांना हे दुकान सुरू करण्यास परवानगी दिली होती, यामध्ये अनाधिकृत असे काही नाही, एखाद्याच्या अन्नामध्ये अशी माती कालवणे, हे अत्यंत चुकीचे आहे, फलटणमध्ये हे घडत असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे, हे घडू नये अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

    फलटण नगर परिषदेने दि. २१ जानेवारी रोजी अवर सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने राजधानी टॉवर्स येथील,  अथर्व स्वीट होम हे दुकान सील केले होते, त्या आदेशाच्या विरोधात दुकान चालक अमोल भोईटे उच्च न्यायालयात गेले असता, उच्च न्यायालयाने अवर सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशास स्थगिती देऊन, दुकानाचे सील काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार फलटण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आज दि. २३ रोजी अथर्व स्वीट होम  दुकानाचे सील काढून, दुकान अमोल भोईटे यांच्या ताब्यात दिले. 

No comments