ट्रिपल तलाक व विवाहितेचा छळ ; फलटण येथे गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - विवाहितेच्या घरच्यांनी लग्नात ब्रश, कंगवा, शाम्पू ,नेलकटर, पानपुडा, इस्त्री, साबण व सहा ग्रॅमची अंगठी पती तोसिफ यांना दिली नाही, म्हणून विवाहितेला उपाशी पोटी ठेवून,शिवीगाळ, मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला, तसेच पोस्टाद्वारे नोटीस पाठवून ट्रिपल तलाक दिल्या प्रकरणी पती, सासू, सासरे व २ नणंद यांच्या विरोधात भा.द.वि.सं. च्या विविध कलमान्वये व मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) अधिनियम २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक २/२/२०२२ रोजी पासून ते दिनांक २६/४/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान मौजे संग्राम नगर, अकलूज ता. माळशिरस येथे १) सासू रेहना नजीर शेख २) सासरे नजीर हसन शेख ३) ननंद आसमा नजर शेख ४) पती तोसीफ नजीर शेख सर्व रा. संग्राम नगर अकलूज ता. माळशिरस ५) नणंद तब्बसुम शहाबाज पठाण रा.कुरूडवाडी ता. माढा या सर्वांनी मिळून, विवाहितेला तिच्या माहेरच्यांनी, लग्नात ब्रश, कंगवा, शाम्पू ,नेलकटर, पानपुडा ,इस्त्री, साबण ,व सहा ग्रॅमची अंगठी पती तोसिफ यांना दिली नाही, म्हणून उपाशी पोटी ठेवून, एक दिवसा आड घरातील भांडी घासायला लावून, माहेरच्या लोकांशी फोनवर बोलले म्हणून, विवाहितेला हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच स्वयंपाक येत नाही, तुला काम करायला उशीर लागतो असे म्हणून शिवीगाळ करून उपाशी पोटी ठेऊन विवाहितेचा मानसिक व शारीरिक जाचहाट करून छळ केला. तसेच दिनांक ६/१०/२०२२ रोजी रजिस्टर पोस्टाद्वारे नोटीस पाठवून, पती तोसीफ यांनी विवाहितेला, तमन्ना मैने तुझे तलाक दिया है, तमन्ना मैने तुझे तलाक दिया है, तमन्ना मैने तुझे तलाक दिया है, असे तीन वेळा उल्लेख करून तलाक दिला असल्याची विवाहिता तमन्ना तोफिक शेख यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहा पोलीस फौजदार शिंदे हे करीत आहेत.
No comments