राष्ट्रीय किशोर व किशोरी खो - खो स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते
![]() |
बारामती येथे ना. अजित पवार यांना राष्ट्रीय खो - खो स्पर्धा उद्घाटन समारंभ निमंत्रण देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खो - खो फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र खो - खो असोसिएशन, सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो - खो असोसिएशन यांच्या संयुक्त सहभागाने फलटण येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ३२ व्या राष्ट्रीय किशोर व किशोरी खो - खो स्पर्धा २०२२ च्या उद्घाटनाचे निमंत्रण महाराष्ट्र विधान सभा विरोधी पक्ष नेते ना.अजित पवार यांनी स्वीकारले आहे.
महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो - खो असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन उर्फ भैय्या भोसले, किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी बारामती येथे ना. अजित पवार यांची भेट घेऊन निमंत्रण दिले.
माजी आमदार श्रीमंत विजयसिंह तथा शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, फलटण येथे शनिवार दि.२९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता या राष्ट्रीय खो - खो स्पर्धांचे उद्घाटन ना. अजित पवार यांच्या हस्ते समारंभ पूर्वक करण्यात येणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर भूषविणार आहेत.
या उद्घाटन समारंभास आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. दिपकराव चव्हाण, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे उपाध्यक्ष आ. अभिमन्यू पवार, भारतीय खो - खो महासंघ अध्यक्ष सुधांशू मित्तल, भारतीय खो - खो महासंघ महासचिव महेंद्रसिंह त्यागी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो - खो महासंघ सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयराव मोरे, महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
फलटण येथे शनिवार दि. २९ ऑक्टोबर ते मंगळवार दि. २ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धा मध्ये देशातील २६ राज्यातून ३० किशोर (मुले) आणि ३० किशोरी (मुली) संघ सहभागी होणार असून या स्पर्धांद्वारे उत्तम खेळ पाहण्याची संधी मिळणार असल्याने क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो - खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.
No comments