मठाचीवाडी येथे घरातून ७५ हजारांचा ऐवज लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे मठाचीवाडी ता. फलटण येथील घरातून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व घड्याळ असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, दिनांक ७/१०/२०२२ रोजी १०.३० ते दि. ८/१०/२०२२ रोजीचा ६.३० वाजण्याच्या दरम्यान मौजे मठाचीवाडी ता. फलटण गावचे हद्दीत ऋषिकेश गौतम शेलार यांच्या राहते घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून, घरातून ३४ हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची गळ्यातील सोन्याची चैन, १७ हजार रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची मोहन माळ, ८ हजार ५०० रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ८ हजार ५०० रुपये किमतीचे रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले, एक हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण व जोडवी तसेच ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम व ५०० रुपये किमतीचे डिजिटल घड्याळ असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असल्याची फिर्याद ऋषिकेश गौतम शेलार यांज दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार साबळे हे करीत आहेत.
No comments