Breaking News

उपळवे शेतात गांजा लागवड ; सव्वापाच लाख रुपयांचा गांजा जप्त

Cultivation of cannabis (Ganja); Ganja worth Rs.55 lakh seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ - मौजे उपळवे ता.फलटण  गावचे हद्दीत शेताच्या मध्यभागी बेकायदा बिगर परवाना गांजा या अंमली वनस्पतीची लागवड केल्याचे सापडले आहे. या ठिकाणी एकूण १३.११० किलोग्रॅम वजनाचा व  ५ लाख २४ हजार ४०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजा लागवडी प्रकरणी उपळवे येथील सागर हिंदुराव लंभाते व हिंदुराव दादु  लंभाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे,  वेशांतर करून, उपळवे भागात शेताच्या मध्यभागी लागवड करण्यात आलेली गांजाची झाडे शोधून काढून ती जप्त केली आहेत.

श्री.धन्यकुमार गोडसे प्रभारी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांना उपळवे ता. फलटण येथील हिंदुराव दादु लंभाते यांचे शेतात हत्तीगवताचे पिकामध्ये गांजाचे पिक लावलेबाबत खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्याने लागलीच, त्यांनी आपले सोबत पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पो. ना. काशिद, पो.ना. जगदाळे, पो.कॉ. कुंभार, पो. कॉ. जगदाळे तसेच नायब तहसिलदार सावंत मॅडम, कृषि पर्यवेक्षक राऊत तसेच दोन पंच, फोटोग्राफर, वजनकाटा धारक असे सोबत उपळवे येथील इसम नामे हिंदुराव दादु लंभाते व सागर हिंदूराव लंभाते यांचे शेतात जावुन छापा मारुन सुमारे १३ किलो वजनाची एकुण ५,२४,४००/- किंमतीचे गांज्याची झाडे जप्त केली असुन, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गु.र.नं ७०९ / २०२२ गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८, २० (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  सदर कारवाई वेळी पोलीसांनी वेषांतर करुन तसेच भर पावसामध्ये आरोपीच्या शेतात जावुन, आजुबाजुला वेगवेगळी पिके घेतलेली असताना पोलीसांनी वेगवगळ्या टीम तयार करुन सर्च ऑपरेशन राबवुन सदरची कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी  अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक, सातारा,अजित बो-हाडे अप्पर पोलीस अधिक्षक, सातारा यांचे सुचनांप्रमाणे  तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पो.ना. अभिजित काशिद, पो.ना. वैभव सूर्यवंशी, पो.ना. अमोल जगदाळे, पो. कॉ. विक्रम कुंभार, पो.कॉ. महेश जगदाळे यांनी केली असून, सदर गुन्हयांचा पुढील तपास स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक या करीत आहेत.

No comments