Breaking News

श्री ब्रम्हविद्या पाठशाळा, तरडगाव येथे व्याख्यानमाला आयोजन

Organized vakhyanmala at Tardgaon

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ -  श्री ब्रह्मविद्या पाठशाळा, महानुभाव आश्रम, तरडगाव, ता. फलटण येथे प्रतिवर्षाप्रमाणे चातुर्मासाच्या उत्तरार्धात श्री ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन  समिती, तरडगाव द्वारा श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून यावर्षी अनुभूती सर्वज्ञ सूत्रांची या विषयाच्या अनुषंगाने नित्यविधी व निमित्तविधी यांचे चिंतन मंथन या व्याख्यानमालेतून  होणार आहे.

    सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतरण अष्टशताब्दी निमित्त ज्ञानामृत व्याख्यानमाला २०२२ चे आयोजन सोमवार दि. २६ सप्टेंबर ते मंगळवार दि. ४ ऑक्टोंबर  दरम्यान दररोज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत श्री ब्रम्हविद्या पाठशाळा, तरडगाव येथे करण्यात येणार आहे.

    सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. व्याख्यानमालेचा शुभारंभ होणार असून श्री ब्रह्मविद्या पाठशाळा, महानुभाव आश्रम, तरडगाव संस्थेचे कुलगुरु आचार्य प्रवर प. पू. महंत श्री राहेरकर बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. व्याख्यानमालेचे हे १३ वे वर्ष आहे‌. 

    पाठशाळा संस्थेतील साधक व विद्यार्थी  व्याख्यानमालेत व्याख्यान सेवा सादर करणार असून विविध विषयांवर अभ्यासपूर्ण, प्रभावी विचारांसह चिंतनशील ज्ञान साधनेतून व्यासपीठावर आपल्या वक्तृत्वाचे कौशल्य सादर करणार आहेत. फलटण व लोणंद शहर आणि तरडगाव पंचक्रोशीतील धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक, उद्योजक विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे‌‌.  
   व्याख्यानमालेचा समारोप सोहळा बुधवार दि‌. ५ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. 

No comments