Breaking News

शिंगणापूर रस्त्यावर दुचाकींची समोरोसमोर धडक ; ३ ठार, ३ गंभीर

Two-wheeler collision on Shingnapur road; 3 killed, 3 seriously

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १४ : फलटण शिंगणापूर रस्त्यावर सोनवडी गावच्या हद्दीत  दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होवून झालेल्या भिषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तिघाजनांची प्रकृती चिंताजनक आहे. 

    याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती नुसार, रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी श्रेयश गोविंद कदम वय २०  रा. कापशी ता. फलटण, ऋषिकेश किशोर चिंचकर वय १८ रा. मलठण, फलटण, यशराज सतिश सूळ वय १८ रा. पणदरे ता. बारामती हे तिघे पल्सर क्र. एमएच ११ सीपी ०६५८ हून शिखर शिंगणापूरला निघाले होते. तर होंडा शाईन क्र. एमएच ११ बीएफ ८४९० वरुन महेंद्र शिवाजी गोफणे वय ३३, पद्मसिंह विश्वास गोफणे वय ३०, धनवंत भगवान गोफणे वय २५ तिघेही रा. जावली ता. फलटण हे   तिघे फलटणकडे निघाले होते. सोनवडी ता. फलटण गावच्या हद्दीतील जानूबाई मंदिरालगत सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. सदर अपघात अतिशय भिषण होता. अपघात स्थळी रक्ताचा सडा पडला होता तर दोन्ही दुचाकींची अवस्था छिन्नविछिन्न झाली होती. सदर अपघाताची माहिती मिळताच फलटण ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. या अपघातातील सर्व जखमींनी तातडीने फलटण येथे उपचारासाठी हलविण्यात आले परंतू श्रेयस गोविंद कदम व ऋषिकेश किशोर चिंचकर यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता तर महेंद्र गोफणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर अपघातातील अन्य जखमी धनवंत गोफणे, पद्मसिंह गोफणे व यशराज सूळ यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून अधिक उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आल्याचे समजत आहे. सदर अपघाताचा तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

    दरम्यान देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र दिनाच्या एक दिवस आगोदर ही घटना घडल्याने व यातील मृत हे तरुण असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

No comments