Breaking News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सातारा येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा

Mini marathon competition at Satara on the occasion of Amrit Mahotsav of Independence

  सातारा  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.

   ही स्पर्धा 8 ते 12 वर्षे मुले/मुली (2 कि.मी.), 18 वर्षे मुले/मुली 5/3 कि.मी.,  पुरुष  (10 कि.मी.) व महिला (5  कि. मी.) या वयोगटामध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/swatantra-amrit-mahotsava-mini-marathon-2022-244213 या लिंकवर    दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत  नांव नोंदणी करावी. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, मेडल, प्रमाणपत्र देऊन  गौरवण्यात येणार असून, स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना मेडल तसेच विहित वेळेत स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना टी-शर्ट देण्यात येणार आहे.

  तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.

No comments