प्रभाग क्रमांक २ फलटण येथे श्रीमंत संजीवराजे व आ. दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन
![]() |
भूमिपूजन प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर समवेत आ. दीपकराव चव्हाण, पांडुरंग गुंजवटे, सनी संजय अहिवळे, सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सुधीर तानाजी अहिवळे, सौ. वैशालीताई सुधीर अहिवळे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मंगळवार पेठ, प्रभाग क्रमांक २ मधील विकास कामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक ४/८/२०२२ रोजी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मा. नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, फलटण नगर परिषदेचे मा. नगरसेवक सनी संजय अहिवळे (दादा), मा. नगरसेविका सौ. वैशालीताई सुधीर अहिवळे, मा. नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, पत्रकार सुधीर अहिवळे, श्रीमंत रामराजे युवा मंच अध्यक्ष राहुलभैय्या निंबाळकर, मधोजी हायस्कूल फलटणचे उपप्राचार्य सुधीर अहिवळे सर, आझाद समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सनीभाऊ काकडे, हरिष काकाडे, रोहितभैय्या माने, सिद्धार्थ अहिवळे , राकेश माने, प्रशांत अहिवळे, दलित पॅंथर चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण काकडे, आप्पा गायकवाड ,निलेश मोरे तसेच कॉंट्रक्टर हेमंत काकडे, अक्षय अहिवळे, विशाल गुंजाळ, मुकुल अहिवळे, तेजस भोसले, रवी मोरे, आदित्य साबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
![]() |
भूमिपूजन प्रसंगी आ. दीपकराव चव्हाण समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे, सनी संजय अहिवळे, सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सुधीर तानाजी अहिवळे, सौ. वैशालीताई सुधीर अहिवळे |
मंगळवार पेठ प्रभाग क्रमांक २ मध्ये धम्मयान चौक ते नवल टेलर, लक्षाई पॉईंट , सोनिया मित्र मंडळ ते जुनी चावडी, माने दुकान ते स्टेट बॅंक ते सचिन अहिवळे घर ते पुणे पंढरपुर रोड , आईस फॅक्टरी ते भगवान सॅा मिल हे सर्व सिमेंट रोड उत्तम क्वालिटेचे झालेले असुन, बंदिस्त गटारे तसेच भीमनगर परिसर, खंडोबा मंदिर परिसर , पंचशील चौक परिसर,चावडी परिसर ,राजु अहिवळे परिसर , लष्कर वाडा परिसर , अशी विकास कामे प्रभाग क्रं २ मध्ये चालु असल्याचे मा. नगरसेवक सनी संजय अहिवळे व मा. नगरसेविका सौ. वैशालीताई सुधीर अहिवळे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
No comments